पळसदेव ता. १ : .महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक शिक्षकेतर संघटना महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध संघटनाच्या माध्यमातून शिक्षक शिक्षकेत्तरांचे विविध प्रश्न समस्या यांना न्याय मिळवून देण्याचे काम खांडेकर यांनी केले आहे .पक्षाने टाकलेला विश्वास आणि जबाबदारी सार्थ ठरवून पक्षवाढ संघटन करीत शिक्षक शिक्षकेतरांना न्याय तसेच विविध शैक्षणिक समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील , माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटना , पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे पर्यवेक्षक विकास पाठक , मल्हारी काळे संतोष पवार ,सदाशिव काळे यांनी खांडेकर यांचे अभिनंदन केले आहे .