भिगवण ता. 4 : खानवटे (ता. दौंड ) या ठिकाणी
जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील व इतर कार्यकर्ते हे सनदशीर मार्गाने मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करीत असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून अनेक मराठा समाज बांधव. महिला. लहान मुले यांना बेकायदेशररित्या भ्याड हल्ला करुन जखमी केले आहे. झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला.
व हल्ल्याचा आदेश देणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रत्यक्ष हल्ला करणारे संबंधित पोलिस कर्मचारी यांना तात्काळ कायमस्वरूपीचे निलंबित करावे अशी मागणी करण्यासाठी व निषेध नोंदवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते
या प्रसंगी सर्व मराठा समाज बांधव तसेच इतर समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
गावातील सर्व व्यापारी व दुकानदार वर्गाने उस्फूर्त बंद ठेवून आजच्या खानवटे बंदला उस्फूर्त असा प्रतिसाद दिला दरम्यानच्या काळात ज्या मागण्या आंदोलनाद्वारे होत आहेत त्या सर्व मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात नाहीतर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे यावेळी ग्रामस्थांनी बोलताना सांगितले
या सर्व मागण्या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी साहेब यांना निवेदन देण्यात आले या निषेध सभेचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ, सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थ खानवटे यांच्या वतीने करण्यात आले होता.