निमगाव केतकी ता. 12 : श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त निमगाव केतकी येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार भरणे यांच्या शुभहस्ते महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री.भरणे म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून अनेक संत महात्म्यांनी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी अध्यात्मिक विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम केले आहे. त्यांच्या विचारांमुळेच आज आपला समाज परस्परांबद्दल स्नेह,जिव्हाळा जपून एकमेकांच्या प्रति आपुलकीने वागत आहे तसेच आपण जन्माला आलेलो सार्थकी झालं पाहिजे,यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज,तुकाराम महाराज,संत एकनाथ,संत नामदेव,संत सावतामाळी,संत चोखामेळा,संत सेना महाराज यांनी समाजाला अध्यात्माची शिकवण घालून दिलेली आहे.त्यामुळे संतांची शिकवण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये रुजवली पाहिजे,हाच खरा मतीतार्थ आजच्या श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचा आहे,असा आशावाद आमदार भरणे यांनी व्यक्त करून श्री संत सेना महाराज व नागोबा मंदिराच्या शुशोभीकरणासाठी २० लक्ष निधी देण्याचे श्री.भरणे यांनी जाहीर केले. तसेच या निमित्ताने ह.भ.प.निलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांचा किर्तन सेवेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.या वेळी सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन पै.दशरथ डोंगरे,पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे,अंकुश जाधव,देवराज जाधव,तात्यासाहेब वडापूरे,बाबासाहेब भोंग यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष जगताप,विशाल जगताप,बजरंग जगताप,लक्ष्मीकांत जगताप,संतोष ह.जगताप,गणेश जगताप,विक्रम जगताप,दादासो जगताप,विष्णुपंत जगताप,बापूराव जगताप आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.