गार ता.12 : गोकुळ अष्टमीनिमित्त अहमनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गार या गावात अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात आनंदात पार पडला या सप्ताह पहिल्या दिवसाची सेवा ह भ प अनिल महाराज मेहेत्रे याचे किर्तन झाले ह भ प सुनील महाराज मुटकुळे हभप दिगंबर महाराज जाधव हभप झाडे महाराज रावसाहेब महाराज शिपलकर ह.भ.प. रमेश महाजन भोसले च किर्तनह.भ.प.कु. निलमताई गलांडे यांचे कीर्तने झाली तसेच आळंदीकर विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले या सप्ताहासाठी गार गावातील वाडी वस्तीवरील भाविक कीर्तनात उपस्थित राहत होते . शेवटी काल्याचे किर्तन कुमारी ह.भ.प. नीलम ताई गंलाडे यांचे झाले यावेळी गारच्या सरपंच सौ. अलकाताई देशमुख व महिला भजनी मंडळ गार यांनी त्यांचा सत्कार केला महाप्रसाद गार वि.का.सोसायटी व श्री दिलीप लक्ष्मण जाधव व श्री ज्ञानेश्वर आत्माराम शेळके यांनी दिला.
सर्व ग्रामस्थांनी व महिला भजनी मंडळी यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले..,