पळसदेव दि.१३ पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या अहिल्या शिंदे हीने शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे यांनी दिली. मध्यप्रदेश शासन आणि विदिशा जिल्हा प्रशासन व शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शमशाहबाद जि. विदीशा ( मध्यप्रदेश) येथे दि.३ ते ५ ऑक्टो . दरम्यान राष्ट्रीय शालेय कुस्ती ( नॅशनल) संपन्न झाल्या . या स्पर्धेत १७ वर्षे वयोगट आणि ६१ किलो वजन गटामध्ये अहिल्याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करत आपल्या प्रतिस्पर्धी हरियाणाच्या कुस्तीपटूवर मात करून राष्ट्रीय (नॅशनल) शालेय कुस्ती स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले. इंदापूर येथील मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्र येथे मल्लविद्येचे प्रशिक्षण घेतलेल्या अहिल्याचे, तिच्या पालकांचे , विद्यालयातील मार्गदर्शक क्रीडाशिक्षक नितीन जगदाळे, सिकंदर देशमुख, सुवर्णा नायकवाडी ,रामचंद्र वाघमोडे यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगीराज काळे संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य बाळु काळे,पर्यवेक्षक विकास पाठक , संजय जाधव ,संतोष पवार वृषाली काळे यांनी अभिनंदन केले* आहे*..