इंदापूर ता. 17 : म्हसोबावाडी (ता. इंदापूर ) येथील ग्रामदैवत यशवंतरायाचा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
14 नोव्हेंबरला दीपावली पाडव्याच्या दिवशी यात्रा स्थळावरील यशवंतरायास पहाटे जलस्नान घालण्यात आले. त्यानंतर सकाळी दहा वाजता यशवंतरायाच्या लग्नाचा कार्यक्रम संपन्न झाला. गावातील यशवंतरायाच्या मंदिरातील देवाची पालखी यात्रा ठिकाणी ओढ्याच्या तीरावरती असलेल्या यशवंतरायाच्या मंदिराकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. यादरम्यान आदराई देवीच्या तळावर देवाचे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले .
त्यानंतर यात्रा स्थळावर 15 नोव्हेंबरला उत्सवाच्या मुख्य दिवशी दिवसभर धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम व कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाला . त्यानंतर याच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यशवंतरायाची पालखी गावातील मंदिराकडे जाण्यासाठी निघाली. परतीच्या मार्गावर रात्रभर अंदराई देवीच्या तळावर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले संपन्न झाले. त्यानंतर 16 नोव्हेंबरला सकाळी लक्ष्मी माता मंदिर तळावर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर गावच्या मंदिरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास देवाची स्थापना केल्यानंतर यात्रेची सांगता झाली. यात्रा काळात बिदाल (ता. माण) काराटी, सावळ, जैनकवाडी ( ता. बारामती ) या गावातील देवाचे सबिने या यात्रेत सहभागी झाले होते .
———————————–
फोटो ओळी म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथील उत्सवातील एक क्षण
————————————-