शेटफळगढे ,ता 28 : खडकवासला प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 27 नोव्हेंबर दुपारी चार वाजल्यापासून सोडण्यात आले आहे.
सध्या पावसाळी इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेल्या गावांमधील ऊस शेतीसह फळबाग लागवडीचे हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय खडकवासला कालव्याच्या लाभ क्षेत्रात अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी असल्याने सध्या या विहिरी देखील भूमिगत जलस्त्रोत असल्याने कोरड्या पडल्या आहेत याचा गावचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे त्यामुळे पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र धरण क्षेत्रातला पाऊस बंद झाल्याने इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याअगोदरच कालव्याचे पाणी बंद करण्यात आले त्यामुळे तालुक्यातील एकाही तलाव कालव्याच्या पाण्याने भरला नाही.
तसेच सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व कुपनलिकालिका देखील कोरड्या पडल्या असल्याने सध्या शेतातील त्पिके जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत तसेच नवीन लागवड देखील उसाच्या झालेल्या नाहीत.
त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आवर्तनाची गरज होती सध्या 27 नोव्हेंबर पासून सोडण्यात आलेले आवर्तन इंदापूर तालुक्यातील सुरुवातीच्या भागात येण्यास जवळपास चार ते पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे तर तालुक्याच्या शेवटच्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सिंचित क्षेत्रात पोहोचण्यास जवळपास आज पासून सात ते आठ दिवसाचा दिवसाचा कालावधी लागणार आहे टेल टू हेड पद्धतीने सिंचनासाठी पिकांसाठी या आवर्तनाचे पाणी दिले जाणार आहे.